पायाशिवाय धावणं शक्य आहे का, या प्रश्नच उत्तर अर्थात नाही असंच आहे. मात्र, पायाशिवायही धावता येतं, तेही ओलंपिकमध्ये.
ऑस्कर पिस्टोरियास यानं हे सिद्ध केलंय. हा माणूस थोरच आहे. त्याच्याविषयी समजून घ्यायचं असेल, तर गीयात्री मेरलो
यांनी लिहिलेलं त्याचं चरित्र वाचावं लागेल. या चरित्राचा मराठी अनुवाद सोनाली नवांगुळ यांनी केला आहे.
ऑस्कर जन्माला आला तेव्हा त्याच्या पायातल्या महत्वाच्या हाडांवाचून. त्यामुळे त्याचे दोन्ही पाय गुदाघ्याखालून कापून काढणं भग पडलं. तिथपासून एक थरारक प्रवासाला सुरुवात झाली. हा प्रवास अनेक अवघड वळणं घेल ऑलिम्पिकपर्यंत पोहचला. अविश्वसनीय वाटावं असं हे यश, त्यानं कसं मिळवलं आणि जीवनाकडे पाहण्यचा हा सकारात्मक दृष्टीकोन त्याच्याकडे कसं आला, ते मुळापासून वाचायला हव.
ड्रीमरनर म्हणजे पायांशिवाय ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असामान्य धावपटूची त्याच्याच स्मरणसाखळीतून उलगडत जाणारी जीवनकहाणी.जीवनाकडे पाहण्याची योग्य मनोदृष्टी असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात याचा प्रत्यय देणारी,अविश्वसनीय तरीही सत्यकथा ! आपल्या घरी जन्माला आलेलं बाळ थोडं वेगळं आहे …
त्याच्या पायातल्या महत्वाच्या हाडांवाचून ते जन्माला आलंय असं त्याच्या आई-बाबांना कळलं. ऑस्करच्या आई-बाबांनी त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापण्याचा अवघड निर्णय घेतला…त्याला भविष्यात जास्तीतजास्त नॉर्मल जगता यावं यासाठी! त्याच्या आईनं त्याला एक पत्र लिहिलं होतं त्यात ती म्हणते “अंतिम रेषा सर्वत शेवटी पार करणारा हा खरा हारतो का ? त्याला पराजित म्हणायचं का ?
नाही ! जो कडेला बसून नुसता खेळ पाहतो , आणि खेळात, स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करायला धजत नाही तो खरा पराजित!”
Reviews
There are no reviews yet.