डायनोसॉर (Dinosaur)

डायनोसॉर (Dinosaur)

कुठे रस्ते बनवण्यासाठी चाललेल्या खोदकामातून मिळालेल्या जीवाष्मांच्या अवशेषांवरून अनुमान केलेला. ती एक मोठी रंजक कथाच आहे.

सोप्या भाषेत, अगदी शाळेतल्या मुलांनादेखील समजेल अशा भाषेत, गोष्ट सांगावी असे लिहिलेले, थोडक्यात महत्त्वाचे, पण भरपूर चित्रांनी सजलेले, संपूर्ण रंगीत असे हे पुस्तक विज्ञान रसिकांसाठी सापडलेला एक खजिनाच म्हणावा लागेल.

79.00

Placeholder

79.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

आनंद घैसास ( Anand Ghaisas)

आज पृथ्वीवर अस्तित्त्वात नसलेले हे महाकाय पालींप्रमाणे दिसणारे प्राणी खरोखरच या पृथ्वीतलावर होते का अशी शंका येणे अगदी स्वाभाविक आहे. कारण त्यांचे अस्तित्त्व पृथ्वीच्या आयुष्यातील एका विशिष्ट कालखंडानंतर दिसूनच येत नाही, ते असे अचानक का नाहीसे झाले हे कोडे खरं तर अजूनही सुटलेले नाही. पण ते होते, हे मात्र प्रकर्षाने जाणवते.

हे महाकाय डायनोसॉर पाण्यातल्या जलचरांंपासून आकाशातल्या पक्ष्यांपर्यंत आणि उभयचर प्राण्यांपासून चार पायांच्या सस्तन प्राण्यांपर्यंत सगळ्यांचेच पूर्वज होते, असे आता लक्षात यायला लागले आहे. सजीवांच्या एकूणच उत्क्रांतीच्या साखळीतला डायनोसॉर हा एक महत्त्वाचा दुवा आहे, हे हाती आलेल्या त्यांच्या विविध जीवाष्मांमधून दिसून आले आहे.

तसा त्यांचा शोध हा अलीकडचाच म्हणावा लागेल. आजपासून मागे गेल्यास फक्त काही शतकांच्या कालावधीतला. तोही कुठे रस्ते बनवण्यासाठी चाललेल्या खोदकामातून मिळालेल्या जीवाष्मांच्या अवशेषांवरून अनुमान केलेला. ती एक मोठी रंजक कथाच आहे.

सोप्या भाषेत, अगदी शाळेतल्या मुलांनादेखील समजेल अशा भाषेत, गोष्ट सांगावी असे लिहिलेले, थोडक्यात महत्त्वाचे, पण भरपूर चित्रांनी सजलेले, संपूर्ण रंगीत असे हे पुस्तक विज्ञान रसिकांसाठी सापडलेला एक खजिनाच म्हणावा लागेल, कायम जपून ठेवावा असा…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डायनोसॉर (Dinosaur)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0