घरट्यातल्या चिमण्या (Ghartyatlya Chimnya)

घरट्यातल्या चिमण्या (Ghartyatlya Chimnya)

दादरमध्ये अनेकांच्या परिचयाच्या असलेल्या प्रभावती बापटाचे व्यक्तिचित्र आणि ‘ पूरणसाव ‘ हे वेगळे व्यक्तिचित्र वाचत असताना लेखिकेची स्वत : ला प्रश्न विचारण्याची ताकद लक्षात येते . ‘ त्यांच्या शेवटच्या इच्छा’मध्ये अंत्यसंस्कारांविषयीचे पुरोगामी विचार , अनेक व्रतस्थ माणसांचे अखेरच्या दिवसात तोल जाणे याची चिकित्सा हे लेखनातील प्रगल्भ आविष्कार आहेत . तसेच प्रेमलग्ने कशी होतात आकर्षण म्हणजे काय ? हे किशोरवयीन मुलामुलींचे प्रश्नही आले आहेत . ‘ कोणासारखी होशी गं मुली ? ‘ सारख्या नर्मविनोदी कथेतील वटसावित्रिचे व्रत गमतीचे आहे .. दादरमधील त्या काळातल्या जीवनाचे चित्र रेखाटताना स्मरणरंजनाच्या सहजप्रेरणेला आवर घालत हे लेखन केले आहे . त्यातील तपशील मोलाचा आहे , पण त्यापलिकडे लेखिकेचा दृष्टिकोन अधिक मोलाचा आहे . – पुष्पा भावे ( प्रस्तावनेतून

Original price was: ₹100.00.Current price is: ₹80.00.

Original price was: ₹100.00.Current price is: ₹80.00.

Add to cart
Buy Now

वसुमती धुरू यांची पाककलानिपुण आहारशास्त्रज्ञ ही ओळख आता जुनी झाली आहे . सजग नजरेने आसपासच्या समाजात वावरणाऱ्या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून दादरची माणसे त्यांना ओळखतात …. एका विशिष्ट भौगोलिक परिसरातील काही स्त्रियांच्या जीवनाची ही रेखाटने आहेत . आठवणी आहेत . त्यात स्मरणरंजनाचाही भाग आहे ; पण लेखिका स्मरणरंजनात फार रमणारी नाही . या पुस्तकात भेटणाऱ्या स्त्रिया तशा सामान्य आहेत , तरीही परिस्थितीवर स्वार होणाऱ्या आहेत … लेखिकेला बदलत्या काळाची , बदलत्या मूल्यांची जाणीव आहे . ती निवेदनात व्यक्तही झाली आहे . कधी स्त्रियांकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी अपेक्षांमधील विनोदही निवेदिकेला जाणवतो … दादरमध्ये अनेकांच्या परिचयाच्या असलेल्या प्रभावती बापटाचे व्यक्तिचित्र आणि ‘ पूरणसाव ‘ हे वेगळे व्यक्तिचित्र वाचत असताना लेखिकेची स्वत : ला प्रश्न विचारण्याची ताकद लक्षात येते . ‘ त्यांच्या शेवटच्या इच्छा’मध्ये अंत्यसंस्कारांविषयीचे पुरोगामी विचार , अनेक व्रतस्थ माणसांचे अखेरच्या दिवसात तोल जाणे याची चिकित्सा हे लेखनातील प्रगल्भ आविष्कार आहेत . तसेच प्रेमलग्ने कशी होतात आकर्षण म्हणजे काय ? हे किशोरवयीन मुलामुलींचे प्रश्नही आले आहेत . ‘ कोणासारखी होशी गं मुली ? ‘ सारख्या नर्मविनोदी कथेतील वटसावित्रिचे व्रत गमतीचे आहे .. दादरमधील त्या काळातल्या जीवनाचे चित्र रेखाटताना स्मरणरंजनाच्या सहजप्रेरणेला आवर घालत हे लेखन केले आहे . त्यातील तपशील मोलाचा आहे , पण त्यापलिकडे लेखिकेचा दृष्टिकोन अधिक मोलाचा आहे . – पुष्पा भावे ( प्रस्तावनेतून

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “घरट्यातल्या चिमण्या (Ghartyatlya Chimnya)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0