हे पुस्तक आहे, विविध वयोगटातल्या मुलांचे पालक, सामान्य वाचक, समुपदेशक, मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि अध्यापक
या सार्यांसाठी ! आजच्या पालकांपुढची आव्हानं असोत किंवा वयाच्या विविध टप्प्यांवर परिस्थितीनुरूप प्रत्येकाला करावं लागणारं समायोजन असो…प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याजवळ असतं व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे ते प्रत्यक्षात आणताही येतं असा विश्वास हे पुस्तक देतं.
सकारात्मक आणि आनंदी व्यक्तिमत्त्वासाठी नियोजन कसं करायचं, किंवा ओसीडी, एडीएचडी, स्किझोफ्रेनिया यांसारखे गुंतागुंतीचे मनोविकार नियंत्रणात कसे ठेवायचे
याबाबतचं उद्बोधक मार्गदर्शन या पुस्तकात वाचायला मिळेल. मुख्य म्हणजे, डॉ. विजया फडणीस यांच्या मानसोपचार क्षेत्रातील तब्बल चार दशकांच्या समुपदेशनाच्या अनुभवांची जोड पुस्तकाला लाभली आहे. या क्षेत्रात . फडणीस यांनी केलले चौकटीबाहेरचे प्रयोग व रुग्णांच्या ‘सक्सेस स्टोरीज’ हे तर या पुस्तकाचं बलस्थान आहे. वनातील ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक अशा पुढील काही बाबींविषयी हे पुस्तक मार्गदर्शन करतं :
* यशाची परिभाषा * वेळेचं नियोजन * संवादाचे महत्त्व
* रागावरील नियंत्रण * नाती जपण्याची गुरुकिल्ली
* ठामपणा * निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं नियोजन
एकूणात समंजस आणि आनंदी जीवनासाठी मनाच्या व्यवस्थापनाच्या या ‘गोष्टी मनाच्या’ निश्चितच सर्वांसाठी वरदान ठरतील !
Reviews
There are no reviews yet.