गाणी भोंडल्याची ( Gani bhondlyachi)

Shop

गाणी भोंडल्याची ( Gani bhondlyachi)

30.00

भोंडला, हादगा, भुलाबाई हे पोरीबाळींचे खेळण्याचे उत्सवातील प्रकार आहेत. त्याची गाणी ही वरवर अर्थहीन वाटतात. परंतु तसे नाही. त्यामध्ये खोल अर्थ आहे. समाज, संस्कृती यांचे त्यामध्ये प्रतिबिंब पडलेले बघायला मिळते.

Placeholder

30.00

Add to cart
Buy Now
Compare

भोंडला, हादगा, भुलाबाई हे पोरीबाळींचे खेळण्याचे उत्सवातील प्रकार आहेत. त्याची गाणी ही वरवर अर्थहीन वाटतात. परंतु तसे नाही. त्यामध्ये खोल अर्थ आहे. समाज, संस्कृती यांचे त्यामध्ये प्रतिबिंब पडलेले बघायला मिळते. नवरात्रामध्ये रोज भोंडला होतो. हस्तनक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. १०-१५ मुली एकत्र येऊन हातात हात धरून पाटाभोवती फेर धरतात. ”ऐलोमा पैलोमा गणेश देवा” ह्या गाण्याने ह्यांची सुरुवात होते. ”माझा भोंडला संपला किंवा करा हादग्याची बोळवण” या गाण्याने भोंडल्याची सांगता होते. अशी सर्व गाणी आजच्या पिढीला कळावीत आणि म्हणता यावीत यासाठीच हे पुस्तक! वऱ्हाडात जेव्हा भुलाबाईची पूजा बांधली जाते तेव्हा महाराष्ट्रात हादग्याची पूजा केली जाते. हादग्याची परंपरा कृषी परंपरेतून आली आहे तर भुलाबाईची सृजनशीलतेतून. हादगा व भुलाबाईची पारंपरिक गाणीही या पुस्तकात वाचायला मिळतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गाणी भोंडल्याची ( Gani bhondlyachi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X