गणेशाचे गौडबंगाल (Ganeshache gaudbangal)

Shop

गणेशाचे गौडबंगाल (Ganeshache gaudbangal)

95.00

या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

Placeholder

95.00

Add to cart
Buy Now
Compare

दुर्गापूजेच्या काळात वाराणशीतील प्रसिद्ध घोषाल कुटुंबाच्या घरातून गणेशाच्या एका मौल्यवान मूर्तीची चोरी होते. ती मूर्ती परत मिळवताना गुप्तहेर फेलूदाला अट्टल बदमाश मगनलाल मेघराज याच्याशी सामना करावा लागतो, एका खुनाचा उलगडा करावा लागतो आणि भोंदू साधूचं बिंग फोडावं लागतं. अक्षरश: अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारी व खिळवून टाकणारी ही आणखी एक चित्तथरारक कहाणी.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे सातवे पुस्तक.

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गणेशाचे गौडबंगाल (Ganeshache gaudbangal)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X