प्रत्येक भारतीयाच्या गुणसूत्राच्या गाभ्यात लोकशाही रुजली आहे. आपल्या जाणिवेचा ती अंगभूत भाग आहे. आपल्या संभाषणांना ती जान देते, आपल्या मनांना ऊर्जा देते आणि आपल्यातील सर्वोत्तम-अर्थात क्वचित घृणास्पदही- बाहेर काढते. जेवढे आपण अधिक वंचित, अधिक गरीब आणि भवतालापासून अधिक तुटलेले, तेवढा देशाच्या निवडणुका आणि लोकशाही यांतील आपला सहभाग आणि जपणुकीची भावना अधिक.
जेव्हा जेव्हा लोकशाहीवर हल्ले होतात, तेव्हा तेव्हा भारतीय मतदार निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिकार करतो. भारतीय निवडणुकांची गाथा म्हणजे स्वातंत्र्याच्या विजयाची कहाणी आहे.
भारतीय मतदार नेहमीच राजकारण्याच्या पुढे असतो… सतत त्याला टोचत, शिक्षा देत आणि गरज असेल तेव्हा एखाद् दुसरा धडाही शिकवीत. मतदाराच्या गुणसूत्रातच लोकशाही असली, तरी आपल्या लोकशाहीचा गाभा राजकीय नेता नव्हे, तर मतदार हाच आहे.
Reviews
There are no reviews yet.