कुमारवयीन मुलामुलींना नवे आयुष्य पुढे दिसत असते. स्वप्नात रमण्याचे दिवस सुरु होतात. वयात येत असताना अनेक शारीरिक बदलही घडत असतात. प्रेम भावना जाणवू लागते. त्यांच्या पुढे आरोग्य, मानसिक समस्या उभ्या राहू शकतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करायला
पालक ही कमी पडतात. काही कारणांमुळे नैराश्येच्या गर्तेत सापडलेली मुले आत्महत्येसारखे उपाय शोधतात. कुमारवयीन मुलांना भेडसावणारे प्रश्न, लैंगिकता, वैद्यकीय समस्या, हस्तमैथुन, समलैंगिकता या व अन्य ४५ वेगवेगळ्या विषयांबाबत डॉ. अमोल अन्नदाते त्यांनी ‘कधीतरी हे बोलायलाच हवे’ यात शास्त्रीय व अचूक भाषेत मार्गदर्शन केले आहे. म्हणूनच मुलांबरोबरच पालकांचेही प्रबोधन होते..
डॉ. अमोल अन्नदाते यांनी तरुण मुलांना वैद्यकीय दृष्टीने मार्गदर्शन केलं आहे. तरुण वयात पडणारे अनेक प्रश्न त्यांनी या पुस्तकात हाताळले आहेत. पत्रोत्तराच्या फॉर्ममध्ये त्यांनी या पुस्तकात नेमकं मार्गदर्शन केलं आहे. या वयात शरीरात होणारे बदल, त्यामुळे मनात येणाऱ्या विविध शंका, या साऱ्याचं निरसन यातील लेखामुळे होतं. लैंगिकतेबद्दलही या वयात अनेक समज व गैरसमज असतात. हे गैरसमज या पुस्तकामुळे दूर होतील. याचबरोबर ऍडमिशन, कोणतं कॉलेज निवडू, रॅगिंगला तोंड कसं देऊ, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.
Reviews
There are no reviews yet.