या पुस्तकात मांडलेल्या कथांमधील किंवा एरवी व्यावसायिक म्हणून भेटणारे पालक हेतुत: मुळीच वाईट नसतात.
मुलांना चांगलं वळण लागावं, त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं, अडचणीहीन आयुष्य मिळावं,
आपल्या ठेचा त्यांना खाव्या लागू नयेत अशा सद्हेतूनं ते प्रेरित झालेले असतात;
परंतु त्यांना आपला हेतू अर्थपूर्णपणे मुलांपर्यंत पोहोचवता येत नसतो. ज्या पद्धतीनं मुलांपर्यंत या गोष्टी पोचतात,
कम्युनिकेट होतात, त्यामुळे फार घोळ होतो.
तो कसा होतो?त्याचे तपशील तपासले पाहिजेत. तो कसा टाळता येईल याविषयी चिंतन आणि मनन केलं आहे
तेच या पुस्तकामधून मांडलं आहे.
Reviews
There are no reviews yet.