दिवाळीत फराळाचं खाऊन वाढलेलं वजन उतरवण्यासाठी,
की प्रेग्नंसीनंतर पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी
की आपला बेस्ट फ्रेन्ड सांगतोय म्हणून केवळ….नक्की कशासाठी रनिंग सुरु करता आहात तुम्ही? याचं उत्तर जर, “मला आता पुढच्या आयुष्यात कायमच फिट राहायचं आहे आणि रनिंग माझ्या जीवनशैलीचा भाग बनवायचा आहे” असं असेल तर… मिलाओ हाथ!
मग हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उत्तम दिशा दाखवेल. काय आहे पुस्तकात?१. आजच्या काळातला रनिंग फिव्हर
२. रनिंगसाठी लागणारी साधन-सामग्री, आहार आणि गॅजेट्स
३. रनिंग दरम्यान शरीर रचनेत घडणारे बदल
४. रनिंगला सुरुवात कशी करावी? वॉर्म-अप, स्ट्रेचिंगचे व्यायाम कोणते?
५. रेस किंवा मॅरेथॉनसाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक तयारी
६. दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन
७. अनुभवी रनर्सचे जिवंत अनुभव आणि इतर बरच काही..रनिंगच्या विश्वात A पासून Z पर्यंत तुमची बाराखडी लखलखित करणारं आणि दस्तूरखुद्द एका नामांकित डॉक्टरने लिहिलेलं इन द लॉन्ग रन उपयोगी पडणारं पुस्तक…. इन द लॉन्ग रन!
Reviews
There are no reviews yet.