प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत, ते दुसर्या कुणाला तरी मिळतंय, ह्याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी, की हे कुठं बोलता येत नाही! त्यासाठी मी ‘दिलासा मंडळ’ स्थापन केलं. मनातील सगळी मळमळ त्यानं इथं ओकायची… याचे वर्गणीदार वाढण्याचा सीझन म्हणजे साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, साहित्य पुरस्कार जाहीर होतात, तो काळ… इथं ठोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सरी माणसं हवीत…” माणसानं मनात दडवून ठेवलेल्या अशा बर्यावाईट स्वाभाविक भावना उदार अंत:करणानं समजून घेणं आणि आपल्या खास नर्म-मुलायम, मिस्कील शैलीत त्या आविष्कृत करणं, हा श्रेष्ठ कथालेखक वपु काळे यांच्या कथालेखनाचा महत्त्वाचा विशेष. मुळात जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच प्रसन्न, आशावादी व उदार आहे; आणि अवघड विकारांचाही धीटपणे अविष्कार करण्याचं त्यांचं कसब तर वाचकाला विस्मयचकित करतं. ‘इन्टिमेट’ मधील प्रत्येक कथा याच कारणानं मनाला भिडते.
Vapu Kale masterfully explores human emotions with wit and honesty. Intimate delves into hidden envy, unspoken struggles, and life’s ironies with a lighthearted yet profound touch. His optimistic perspective and fearless storytelling captivate readers, making each story relatable, thought-provoking, and deeply engaging, blending humor with raw human truths.
Reviews
There are no reviews yet.