देशाच्या राजकारणात अलीकडच्या काळात अस्मिता जागवित अनपेक्षितरित्या प्रसिद्धी पावलेलं नाव म्हणजे अरविंद केजरीवाल! दिल्लीतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांचा ‘ऑड इव्हन फॉर्म्युला’ असो, ‘डीसीसीए’ प्रकरणी थेट देशाच्या अर्थमंत्र्यांवर शरसंधान असो की दोषी पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री असतानाही रस्त्यावर उतरून आंदोलन करणं असो, आपल्या भूमिकेशी ठाम राहात आणि फक्त जनहिताशी बांधिलकी राखत केजरीवालांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीमध्ये केलेल्या जनलोकपाल आंदोलनानं केजरीवालांना राष्ट्रीय व्यासपीठावर आणून उभं केलं.
आंदोलन संपलं नि आम आदमी पक्षाची स्थापना करीत केजरीवालांनी थेट राजकारणात उडी घेतली. दिल्लीचं तख्त काबीज करीत पाहता पाहता त्यावर पाणी सोडायलाही मागे-पुढे पाहिलं नाही. पुढे थेट लोकसभा… पुन्हा दिल्ली विधानसभा आणि एका इतिहासाची निर्मिती…!
व्यक्तिगत स्वार्थ, पद, प्रतिष्ठा, लोभ या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवत देशातील ‘आम आदमी’च्या हितासाठी झटणाऱ्या, त्यासाठी रात्रंदिन युद्धाचा प्रसंग अनुभवणाऱ्या एका ‘खास आदमी’ची… दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची… प्रत्यक्ष भेटीगाठीतून उलगडत गेलेली समग्र वाटचाल.
Reviews
There are no reviews yet.