आगीशी खेळताना (Aagishi Kheltana)

आगीशी खेळताना (Aagishi Kheltana)

या कहाण्यांतून या स्त्रियांनी केलेल्या चर्चातून ‘आम्ही अबला तर नाहीच, पण अडाणी विचारशून्य याचकही नाही’ हा विचार पुन्हा पुन्हा स्पष्टपणे पुढे येतो. आज फुले, अविडकर आणि स्त्री आंदोलनांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात एकाकडे आंदोलनात काहीसा ठहराव दिसतो, तर दुसरीकडे शासन दरबारी व अकादमिक पातळीवर स्त्रीमुक्ती किंवा सवलीकरण हे परवलीचे शब्द अनेक प्राणहीन कर्मकांडात वापरले जात आहेत. अशा वेळी या पुस्तकाच्या निमित्ताने काही नव्या चर्चा घडतील अशी खात्री आहे.

Original price was: ₹180.00.Current price is: ₹160.00.

Original price was: ₹180.00.Current price is: ₹160.00.

Add to cart
Buy Now

जागतिकीकरणाच्या आजच्या टप्प्यावर स्त्रिया आणि स्त्रियांचे प्रश्न है अचानकपणे जागतिक अग्रक्रमाचा भाग बनले. खेड्यातल्या स्त्रियांचे सबलीकरण हा जणू नवा मंत्रच आहे या थाटात साक्षरता कार्यक्रम, बचत गट, महिला संघटन हे कार्यक्रम या जादूच्या नव्या कांड्या मानल्या जाऊ लागल्या.

या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातल्या छोट्या गावातल्या, स्त्रीविषयक सरकारी योजनेशी संबंधित स्त्रियांनी एकत्र येऊन आपापले खाजगी अनुभव अतिशय मोकळेपणाने सांगितले, लिहून काढले, हे तर महत्त्वाचे आहेच; परंतु त्या अनुभवांना भोवतालच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संदर्भचौकटीत पारखले हे विशेष आहे. या मंथनातून आजवरच्या स्त्रीविषयक अनेक गृहितकांना प्रश्नांकित केले गेले. उदाहरणार्थ, सर्व स्त्रियांचे दुःख समान असते, किंवा पहिल्या जगातील ‘तारणहार’ दाते आणि भूतदयेचा विषय असणाऱ्या तिसऱ्या

जगातील गरीब ‘याचक स्त्रिया’ असे विकासविषयक देवाण-घेवाणीत दोन वर्ग असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखन-संशोधन-निर्मितीच्या सहभागी प्रक्रियेत स्त्री-अभ्यास क्षेत्रातील एक ख्यातनाम अभ्यासक त्यांची संगतिन म्हणजे साथीदार झाली. त्यातून अकादेमिक क्षेत्र आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे जग यांच्या परस्पर संबंधातल्या ताण-तणावांबद्दलही मोकळेपणी चर्चा झाली. या भावनिक-वैचारिक-आंदोलनात्मक संघर्षमय प्रवासाची ही खिळवून टाकणारी बखर ‘स्त्रीमुक्ती’ च्या स्वयंसेवी संस्थांच्या पर्वातल्या राजकारणामागचा गुंता समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल यात शंका नाही.

या कहाण्यांतून या स्त्रियांनी केलेल्या चर्चातून ‘आम्ही अबला तर नाहीच, पण अडाणी विचारशून्य याचकही नाही’ हा विचार पुन्हा पुन्हा स्पष्टपणे पुढे येतो. आज फुले, अविडकर आणि स्त्री आंदोलनांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात एकाकडे आंदोलनात काहीसा ठहराव दिसतो, तर दुसरीकडे शासन दरबारी व अकादमिक पातळीवर स्त्रीमुक्ती किंवा सवलीकरण हे परवलीचे शब्द अनेक प्राणहीन कर्मकांडात वापरले जात आहेत. अशा वेळी या पुस्तकाच्या निमित्ताने काही नव्या चर्चा घडतील अशी खात्री आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आगीशी खेळताना (Aagishi Kheltana)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0