भारतीय राजकारणात एखाद्या धूमकेतूसारखं उगवलेलं व्यक्तिमत्त्व. केजरीवालांची वैचारिक आणि पक्षीय वाटचालही नागमोडी. त्यांचं मूल्यमापन करताना भलेभले बुचकळ्यात पडतात. तरुणांची प्रतिक्रिया : या माणसाची टोटल लागत नाही! केजरीवालांच्या ‘आप’नं दिल्ली जिंकली, पंजाब सर केला. आताही त्यांनी गुजरात, हिमाचल प्रदेश अन् दिल्ली महापालिका या ठिकाणच्या निवडणुका लढवल्या. गुजरातमध्ये हरले, पण ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. हिमालयामध्ये पूर्ण निष्प्रभ, तर दिल्ली महापालिकेत सत्ता हस्तगत. केजरीवालांचा राजकीय आलेख कधी चढतो, कधी घसरतो. ते जिंकतात, हरतात,जिंकतात… अशा कार्यक्षम पण वादग्रस्त, महत्त्वाकांक्षी पण अनाकलनीय राजकीय नेत्याच्या वळणावळणाच्या प्रवासाचा साक्षेपी वेध.
Reviews
There are no reviews yet.