स्त्री-पुरुषाच्या नात्याचं नाव काय आहे, यावरून त्या नात्याची व पर्यायाने त्या व्यक्तींची सामाजिक प्रतिष्ठा आपल्याकडे निश्चित केली जाण्याची परंपरा आहे. प्रियकर व प्रेयसी हे शब्द व प्रेम हे नातं अस्तित्वात असलं, तरी त्याला अधिकृत मान्यतेचा शिक्का लग्नामुळेच बसतो – हे सर्वज्ञात आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे अशा ‘निनावी’ नात्यांमध्ये पुरुष साळसुद सुटका करून घेऊ शकतात, पण स्त्रियांसमोर मात्र प्रश्नांचे डोंगर उभे राहतात. प्रियकरावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसलेल्या स्त्रीलादेखील ‘प्रेयसी’ वा ‘मैत्रीण’ म्हणून सन्मान मिळतच नाही, उलट तिची ‘रखेल’ म्हणून अवहेलना केली जाते. उद्योजक, लेखिका असलेल्या डॉ. प्रभा खेतान यांनी आपल्या ‘प्रेमा’साठी जे निर्णय घेतले, ज्यांमुळे त्यांना सामाजिक अप्रतिष्ठा व मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागला, त्याचा धीट व मोकळा लेखाजोखा या आत्मचरित्रात आहे.
Reviews
There are no reviews yet.