हा लेखनप्रपंच आधारित आहे निदानप्रक्रियेवर, जी वैद्यकशास्त्राचा आधारस्तंभ आहे. त्या प्रक्रियेचं विश्लेषण करून लोकशिक्षण देण्याचा हा एक प्रयत्न. आजच्या वैद्यकीय व्यवसायामध्ये ज्या काही गोष्टी आपण ऐकतो आणि बघतो त्यामुळे बहुसंख्य रुग्णांना असा प्रश्न पडतो, की योग्य तो औषधोपचार मिळणं आजकाल सहज शक्य का नाही?
दुखणं पाठीचं असतं अन् उपचार पोटावर केले जातात किंवा दुखत छातीत असतं आणि आजार पोटात असतो. अशा वेळी बऱ्याचदा आजाराचं निदानच दिशाभूल करणारं ठरतं. त्यामुळे रुग्ण मानसिक, शारीरिक आणि आर्थिक बाबींनी त्रस्त होतात…
अचूक उपचारांसाठी वैद्यकशास्त्रात ‘अचूक निदान’ महत्त्वाचं ठरतं.
‘अचूक निदान’ या पुस्तकातून डॉ. रवी बापट यांनी अतिशय आस्थेनं वैद्यकीय उपचारातलं अचूक निदानाचं महत्त्व अनेक उदाहरणांसह अधोरेखित केलं आहे.
Reviews
There are no reviews yet.