स्वयंपाकशाळा ( Swayampakshala)

स्वयंपाकशाळा ( Swayampakshala)

थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून स्वयंपाक केल्यास रुची, पोषणमूल्य, चुकांची दुरुस्ती असं सर्व काही साधता येईल. ‘आधुनिक युगातील सुगरण’ होण्यासाठी शास्त्रीय धडे देणारी… डॉ. वर्षा जोशींची स्वयंपाकशाळा!

225.00

Placeholder

225.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi)

स्वयंपाक म्हणजे कला आणि विज्ञान यांचा सुरेख मेळ घालून केलेली कृती, हे एकदा पटलं की, त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतात आणि विविधप्रकारे नावीन्यही आणता येतं. थोडा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर, एखादा पदार्थ जास्तीतजास्त चविष्ट कसा होईल याचा विचार करता येईल आणि एखादा पदार्थ बिघडण्यामागचं कारणही समजून येईल. डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाद्वारे अत्यंत सोप्या भाषेत स्वयंपाकघराची ‘शास्त्रीय सफर’ घडवून आणली आहे.
पुस्तकात तीन विभाग आहेत…
पहिल्या भागात… जेवणातील पदार्थ किंवा सणासुदीला बनवले जाणारे पदार्थ यांच्या घडण्या-बिघडण्यातलं गुपित, भाज्या करताना घ्यायची काळजी, स्वयंपाक करताना होणाऱ्या चुका, बिघडलेले पदार्थ सुधारता येतील अशा युक्त्या

दुसऱ्या भागात… रोजच्या आहारातल्या विशिष्ट ऋतुत मिळणाऱ्या आणि महत्त्वाच्या अशा भाज्यांचं पोषणमूल्य, त्यांचं आहारातील महत्त्व

तिसऱ्या भागात… फळांचं आहारातील महत्त्व, फळांमधील पोषणमूल्यं, कोणत्या वयोगटाने व विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी कोणती फळं खावीत याबद्दल मार्गदर्शन

अगदी रोजचा वरण-भात करायचा म्हटला तरी तो रोज सारखाच होईल याची शाश्वती नसते. अशा वेळी थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून स्वयंपाक केल्यास रुची, पोषणमूल्य, चुकांची दुरुस्ती असं सर्व काही साधता येईल. ‘आधुनिक युगातील सुगरण’ होण्यासाठी शास्त्रीय धडे देणारी… डॉ. वर्षा जोशींची स्वयंपाकशाळा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वयंपाकशाळा ( Swayampakshala)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0