सृष्टीची सेवा ईश्वराची मैत्री (Srushtichi Seva Ishwarachi Maitree)

सृष्टीची सेवा ईश्वराची मैत्री (Srushtichi Seva Ishwarachi Maitree)

राज्यकारभारातील अंमलदार; तसेच धर्माच्या नावाने काम करणारे मोक्षगुरू व पुरोहित हेसुद्धा नोकरच आहेत. लोकांच्या प्राणवित्तांचे संरक्षण करणे हे राज्यकर्त्याचे कर्तव्य असते आणि लोकांच्या नीतिमत्तेचे संरक्षण करणे हे गुरू-पुरोहितांचे कर्तव्य असते. राज्यप्रशासनासाठी राजा नियम, कायदे करतो त्याचप्रमाणे धर्मगुरूंनी आपले कर्तव्य नीट पार पाडता यावे म्हणून कायदे व नियम घालून देण्याचा व अमलात आणण्याचा राज्यकर्त्यांना हक्क आहे.

Original price was: ₹120.00.Current price is: ₹95.00.

Original price was: ₹120.00.Current price is: ₹95.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

सयाजीराव गायकवाड/Sayajirao Gaikwad

धर्म मानवीजीवनाचे एक अंग आहे. ते निर्दोष आणि सत्यमय असावे. जीवन सुंदर, सुखावह आणि सार्थ करण्यास धर्माची मदत होते. खरा धर्म विश्वबंधुत्वाची शिकवण देतो. सदाचरण आणि सद्गुणांची वाढ करतो.
परमेश्वराचे म्हणा किंवा निसर्गाचे कायदे मोडले, तर तो हमखास शिक्षा करणार, त्यानंतर विपन्नावस्था ठरलेली. ज्ञानविज्ञानाच्या संगतीने अज्ञान व खुळ्या समजुती घालवून टाका.
राज्यकारभारातील अंमलदार; तसेच धर्माच्या नावाने काम करणारे मोक्षगुरू व पुरोहित हेसुद्धा नोकरच आहेत. लोकांच्या प्राणवित्तांचे संरक्षण करणे हे राज्यकर्त्याचे कर्तव्य असते आणि लोकांच्या नीतिमत्तेचे संरक्षण करणे हे गुरू-पुरोहितांचे कर्तव्य असते. राज्यप्रशासनासाठी राजा नियम, कायदे करतो त्याचप्रमाणे धर्मगुरूंनी आपले कर्तव्य नीट पार पाडता यावे म्हणून कायदे व नियम घालून देण्याचा व अमलात आणण्याचा राज्यकर्त्यांना हक्क आहे.
फळाची अपेक्षा न करता जो कर्म करतो तोच खरा संन्यासी, तोच खरा योगी आणि तोच खरा प्रशासकही. लोककल्याणातच राजाचा-प्रमुखाचा मोक्ष असतो.
ज्ञानासारखे पवित्र आणि शक्तिमान जगात दुसरे काही नाही. ज्ञानप्राप्तीसाठी आपले कर्म/काम शुद्ध आणि परिपूर्ण असावे लागते.
सृष्टी ही निसर्गाने निर्माण केलेली धनसंपदा आहे. तिचे रक्षण करण्याने माणसातील परमेश्वराची मैत्री वाढत जाते. आपल्या आजूबाजूंच्या बंधूंना मदत करण्याने ईश्वराचीच सेवा घडत जाते.’’
– महाराजा सयाजीराव गायकवाड

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सृष्टीची सेवा ईश्वराची मैत्री (Srushtichi Seva Ishwarachi Maitree)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0