या शेताने लळा लावला – ना.धों.महानोर
शेती ही केवळ शेतकऱ्यांची नसते; ती सृष्टीतल्या अवघ्या चराचरांची-पशुपक्ष्यांची असते, संपूर्ण देशाला उभारणी देणारी असते. शेती मोडली, दुष्काळ आला तर संपूर्ण देश मोडण्याची शक्यता असते. शेतकरी आपल्या शेतात आजन्म आणि अव्याहत राबत असतो. मात्र, आज प्रचंड वाढलेल्या शेतीखर्चाच्या चक्रव्युव्हात शेतकरी गाडला जातोय. त्याच्या घामाचं आवश्यक ते मूल्य त्याला मिळत नाहीय. अशा परिस्थितीत ५० वर्षं शेती करत असताना शेती-पाणी-त्यातलं अर्थकारण या सगळ्याबाबतच्या सुख दुःखाचे अनुभव काय होते हे सांगणारं ना.धों.महानोर यांचं पुस्तक म्हणजे या शेताने लळा लावला. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विकासाची गंगा पोहचवण्याचा लेखकाचा हा प्रवास नक्की वाचा.
Reviews
There are no reviews yet.