प्रत्येक माणसाचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध येतच असतो.
इतर क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षांत अनेक बदल झाले आहेत.
त्या बदलांचा मागोवा घेत घेत केलेलं परखड भाष्य म्हणजे हे पुस्तक.
वैद्यकीय पेशा ते उद्योग अशा या प्रवासाचं हे सडेतोड विश्लेषण !
आरोग्यव्यवस्थेत जे काही चाललं आहे,
त्यामुळे समाज उद्विग्न झाला आहे, लोकांचा विश्वास उडत चालला आहे.
डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातली दरी वाढत चालली आहे.
हे का आणि कसं घडत गेलं याचाच वेध घेण्याचा हा प्रयत्न.
सामान्य माणसाला पडणारे हे प्रश्न आहेत.
या व्यवसायाला पूर्वप्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल,
तर सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.
आकस नाही, आस्था आहे, टीका नाही; विधायक सूचना आहेत..
आजच्या आरोग्य व्यवस्थेतील वास्तवाचं हे पोस्टमॉर्टम्!
Reviews
There are no reviews yet.