मधुमेहाचे नाते नावाप्रमाणे गोडाशी म्हणजेच साखरेशी जोडले आहे. एकदा का रोगाची लागण झाली की शरीरात ठाण मांडून बसतो. मग अशा वेळी मधुमेह नियंत्रणात ठेवून रुग्णाला निरामय जीवन कसे जगता येईल याविषयी डॉ. विजय श्रीधर आजगावकर यांनी ‘नाते जुळले मधुमेहाशी’मधून मार्गदर्शन केले आहे.
वेगवेगळ्या वयोगटातील मधुमेहींशी संवाद साधत, त्यांच्या शंकांचे प्रश्नांचे निरसन करीत डॉक्टरांनी मधुमेह समजून सांगितला आहे. त्यामुळे मधुमेह म्हणजे काय, तो कसा होतो, प्रकार, निदान, उपचार जीवनशैली, तणाव व तणावमुक्ती याविषयी प्रथम सांगतिले आहे.
व्यायामाचे महत्व, आहार काय असावा व असू नये, खाण्याच्या वेळा, उपवासाचे परिणाम, आहारातून नैसर्गिक उपचार याची माहिती आहे. औषधांचे प्रकार गोळ्यांचा दुष्परिणामाची शक्यता, इन्सुलिनची गरज, ते का व कधी घ्यायचे, कसे घ्यायचे, शरीरातील इन्सुलिन निर्मिती, मधुमेह नियंत्रणासाठी घ्यावयाची काळजी, आवश्यक तपासण्या, मधुमेहाची लागण झाल्यावर निर्माण होणाऱ्या विकृती, वय व मधुमेह यांचा संबंध, मधुमेहावर महिलांवर होणारे परिणाम यातून या रोगाची माहिती समजते व याबद्दलच्या शंका. समज – गैरसमज दूर होतात.
Reviews
There are no reviews yet.