मनं छोटं असलं की छोट्या गोष्टींचं दुःख मनात मावत नाही. मन मोठं असलं की, मोठ्या गोष्टींचं दुःखही छोटं वाटतं, नात्याच्या रोपट्याचा वृक्ष होण्यासाठी सहनशीलतेचं खतपाणी घालावं लागतं, ‘मोजकी, नेमकी आणि अचूक शब्दयोजना करुण बोला,”सुचलेली कल्पना कितीही वेडगळ वाटली तरी त्यातून जुन्या समस्यांची नवीन उत्तरं मिळतील,
‘एखादी कळलेली गोष्ट वळविण्याकरिता भरपूर सराव करावा लागतो, अशी कितीतरी सुभाषितवजा वाक्ये या पुस्तकात वाचायला मिळतात. डॉ. राजेंद्र बर्वे यांनी छोट्या छोट्या लेखांमधून शांत झोपेसाठी, भांडण न होण्यासाठी, सदैव छान दिसण्यासाठी, कामाचा उरक वाढविण्यासाठी, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी काय करावे आदी विषयावरचे सल्ले दिले आहेत.
Reviews
There are no reviews yet.