केवळ आयटीतच | Keval IT Tach

केवळ आयटीतच | Keval IT Tach

काही सामाजिक व पर्यावरणीय दुष्परिणामही दिसू लागले आहेत. उदा. जीवनशैलीतले बदल, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, वाहनांच्या संख्येत व प्रदूषणात झालेली मोठी वाढ आणि दैनंदिन जीवनामध्ये भाजीपाल्यापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सगळया गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणं…
अशा या ‘बूमिंग’ आयटी उद्योगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक…
केवळ ‘आयटी’तच…!

150.00

150.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

Atul Kahate

आयटी किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बीपीओ किंवा कॉल सेंटर हे शब्द आज आपल्या परिचयाचे झाले आहेत. मात्र आयटी म्हणजे नक्की काय? भारतात या क्षेत्राची कशी सुरुवात झाली? किंवा येथे नक्की कशा स्वरूपाचं काम असतं याची मात्र आपल्याला तितकीशी कल्पना नसते. अतुल कहाते हे आयटी उद्योगात अनेक वर्षं उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून आणि निरीक्षणातून भारतातील आयटीचा उगम, वाढ-विस्तार व एकूणच या क्षेत्राची वाटचाल सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे ते आयटीबद्दलचं सर्वसाधारण कुतूहल शमवण्यासाठी!
आयटी उद्योगाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख, आत्मविश्वास दिला. येथील गलेलठ्ठ पगारांमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना जन्मात बघितली नसतील अशी स्वप्नं साकार करण्याची ताकद मिळाली! नोकरीनिमित्त अनेक भारतीय मोठया प्रमाणात परदेशात जाऊ शकले. लहान गावा-शहरांमधली मुलं-मुली सिंगापूरपासून कॅलिफोर्नियापर्यंत वरचेवर जाऊ लागली. या उद्योगामुळे प्रकर्षाने तरुण वर्गात सुबत्ता दिसू लागली…
मात्र याचबरोबर त्याचे काही सामाजिक व पर्यावरणीय दुष्परिणामही दिसू लागले आहेत. उदा. जीवनशैलीतले बदल, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, वाहनांच्या संख्येत व प्रदूषणात झालेली मोठी वाढ आणि दैनंदिन जीवनामध्ये भाजीपाल्यापासून ते घरांच्या किमतींपर्यंत सगळया गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणं…
अशा या ‘बूमिंग’ आयटी उद्योगाचा इतिहास, प्रवास व विस्तार उलगडून दाखवणारं पुस्तक…
केवळ ‘आयटी’तच…!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “केवळ आयटीतच | Keval IT Tach”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0