पुरुषसत्ताक समाजाचा विरोध, कट्टर धार्मिक लोकांचा विरोध आणि अस्पष्ट विचार व गोंधळलेल्या मनामुळे नेहमी भूमिका घेऊ न शकणारे कुंपणावरचे लोक, तसंच मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांवर इतर धर्माच्या – विशेषत: हिंदू स्त्रियांनी का बोलावं असा विचार करून दुफळी मानणाऱ्या स्त्रिया – यांना सामोरं जात मुस्लिम स्त्रियांच्या संघर्षाची वाटचाल मंद गतीने का होईना, पण सुरू आहे.
या संघर्षाचं समाजामनाला भानावर आणणारं चित्रण या कादंबरीत केलेलं आहे. भावव्याकुळतेला कणभरही थारा न देता, विद्रोह असला तरी लेखन किंचितही आवाजी होऊ न देता तर्कबुद्धीचा चकित वापर करत, ठाम विधानांनी ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते.
Reviews
There are no reviews yet.