लहानपणी आजारी, एकाकी असलेला मुलगा लैंगिक शोषणाला बळी पडतो. एका कुटुंबवत्सल घरात तो ही गोष्ट कोणालाही सांगू शकत नाही. नंतर त्यालाच मुलांचे आकर्षण वाटू लागते. स्वतःतील वेगळेपण, स्त्रीत्व त्याला जाणवू लागते. आपण ‘गे’ आहे त्याला कळते. नंतर तो हिजडा बनण्याचा निर्णय घेतो. तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. पण, कुटुंब त्याच्या पाठीशी उभे राहते. नवीन रूप धारण केल्यावर बदललेले आयुष्य, जग, समाजाचा दृष्टिकोन, उपहास, टीकेचा सामना करीत लक्ष्मीनारायण त्रिपाठी हा लक्ष्मी नावाने जगू लागतो. मुंबईतील आपल्या कम्युनिटीसाठी काम करणारी लक्ष्मी राज्य, देश व थेट जागतिक पातळीवर पोचली आहे. अन्यायाविरुद्ध इतरांना न्याय मिळवून देत आहे; तसेच स्वतःतील नृत्यकला जपत त्याचे धडे देत आहे. त्याचे शब्दांकन वैशाली रोडे यांनी केले आहे. कायम तुच्छ नजर, विनोदाचा विषय ठरलेल्या व समाजाचाच एक भाग असलेल्या तृतीयपंथियांच्या व्यथा व कथा यातून समजतात. त्यातून समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल.
Reviews
There are no reviews yet.