कहाणी शब्दांची (Kahani Shabdanchi)

कहाणी शब्दांची (Kahani Shabdanchi)

मराठीच्या पन्नासावर बोलीभाषा आणि त्यांतील गमतीदार म्हणी, वाक्प्रचार, यांबरोबर त्या बोली बोलणार्‍या आदिवासींच्या

चालीरीती आणि शब्दांचा योग्य वापर न केल्यानं

आपण घालत असलेला गोंधळ सांगणारी

ही ‘शब्दांची कहाणी’.

250.00

250.00

Add to cart
Buy Now

‘इशारा’ आणि ‘इषारा’ यांच्या अर्थांत नेमका फरक काय?

कांद्याला ‘कृष्णावळ’ असं का म्हणतात? ‘सुरळीत पार पडणे’

किंवा ‘झक मारणे’ म्हणजे नेमकं काय आणि

या म्हणी तयार करी कशा झाल्या? इथंपासून ते पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे आणि हडप, काशिद, शिकलगार, पोतनीस, इथपर्यंतची आडनावं का आणि कशी पडली?

याला काही ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ आहेत का?

असल्यास ते कोणते? याचं कुतूहल शमवणारी

ही ‘शब्दांची कहाणी’.

फारसी, पोर्तुगीज आणि इतर भाषांतून जसे शब्द आले

तसे मराठीतूनही इतर भाषांत काही शब्द गेले ते कोणते? कृष्णाकाठच्या वांग्याचं ‘भरीत’ तर सर्वांच्या आवडीचं.

पण या भरीत शब्द म्हणजे अरबस्तानातल्या ‘बुर्राणियत’चं

मराठी रुपडं. तर ‘डॅम्बीस’ म्हणजे ‘यू डॅम्ड बीस्ट’ किंवा

‘डांबरट’ म्हणजे ‘यू डॅम्ड रॅट’चं मराठीकरण हे सांगणारी

ही ‘शब्दांची कहाणी’.

‘भाऊगर्दी’ आणि ‘सतराशे साठ’ ही पानिपताची देणगी,

तर ‘इश्श’ आणि ‘अय्या’ ही तामिळीची देणगी.

‘दिलाखुलास’ आणि ‘आतिशबाजी’ फारसीमधली,

तर ‘इसान’ आणि ‘पखाल’ चक्क संस्कृतमधले.

त्यांचा आजच्या मराठीपर्यंतचा प्रवास सांगणारी

ही ‘शब्दांची कहाणी’.

मराठीच्या पन्नासावर बोलीभाषा आणि त्यांतील गमतीदार म्हणी, वाक्प्रचार, यांबरोबर त्या बोली बोलणार्‍या आदिवासींच्या

चालीरीती आणि शब्दांचा योग्य वापर न केल्यानं

आपण घालत असलेला गोंधळ सांगणारी

ही ‘शब्दांची कहाणी’.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कहाणी शब्दांची (Kahani Shabdanchi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0