आजच्या वेगवान बदलांच्या काळात शिक्षणात ध्येयवाद आणि भावनांक विकसन या गोष्टी खूप दूर गेल्या आहेत. मुलं, पालक, शिक्षक, शाळा, संस्था यांविषयी असं विश्लेषण अनेक प्रकारे करता येईल. पण मुख्य प्रश्न, हे सारं बदलायचं कसं, हा आहे. शिक्षणक्षेत्रात ध्येयवाद आणायचा कसा? मुलांचा भावनांक वाढवायचा कसा? या नव्या पिढीला संवेदनशील बनवायचं कसं? हे कळीचे प्रश्न आहेत.
अशा या गंभीर सामाजिक परिस्थितीत शिक्षक, पालक व मुलं यांना एकाच वेळी संबोधित करायला आणि या तीनही घटकांना अधिक संवेदनशील आणि प्रेमळ बनवायला साने गुरुजी हेच एकमेव औषध आहे. यातून केवळ शिक्षणक्षेत्रावरच चांगला परिणाम होणार आहे असं नाही, तर व्यापक पातळीवर समाज अधिक संवेदनशील, उत्तरदायी होणार आहे. शेवटी समाजाचे नायक कोण आहेत, यावर त्या समाजाची प्रेरणा आणि समाजाची प्रकृती कळत असते. तेव्हा साने गुरुजी समाजाला पुन्हा एकदा श्रद्धास्थान वाटणं, हा समाजाचा प्रवास विवेकाकडे आणि संवेदनशीलतेकडे असेल. त्यासाठीच गुरुजींचं हे जागरण, त्यांच्या जाण्यानंतर 65 वर्षांनी पुन्हा एकदा.
Reviews
There are no reviews yet.