माणसाची जात उन्नत व्हावी म्हणून जगातील बरीच माणसं
स्वतःहून धडपडत असतात. खपतं असतात. अशी धडपड
करा असं त्यांना कुणी सांगत नाही. त्यांचं तेच ठरवतात की,
आपण माणसांच्या उन्नतीचं काम करू, त्या कामासाठी ते
आयुष्यभर झटत राहतात, प्रयोग करत राहतात. आणि
नंतर हीच माणसं सगळ्या जगाला प्रेरणा देणारी ठरतात.
अशाच एका मागास देशातल्या मागास समाजात शिक्षणाचे
आदर्श प्रयोग करणाऱ्या एका बाईची ही कहाणी. तिच्या
जिवापाड राबण्याची, हालअपेष्टा सोसण्याची, पण शेवटी
आपलं स्वप्न जिद्दीनं पूर्ण करण्याची ही रोचक कहाणी.
सगळ्या मागास जगालाच प्रेरणादायी ठरावी अशी.
शिकायची आणि शिकवायची इच्छा असलेल्या
भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडेल अशी
एका जबरदस्त बाईची आणि तिच्या प्रयोगांची ही
चरितगाथा आहे.
Reviews
There are no reviews yet.