जन्मापासून अखंड सोबत करणार्या मृत्यूला सामोरं जाणं मानवी मनाची कसोटी पाहतं.
त्यात मृत्यूने आगमनाची पूर्वसूचना-तीही थोडी आधीच-दिल्यास त्याला स्वीकारणं
सोपं जातं. मृत्यूने अचानक येऊ नये, तो आला तरीही, विशेष त्रास न देता
शांतपणे यावा, तो वेदनारहित असावा किंवा वेदना अपरिहार्य असल्यास त्याने सुसह्य
वेदनांसह यावं, सर्व प्रिय, आप्त सोबत असताना यावा या व अशा अनेक अटी
आपण मृत्यूसमोर दिवसरात्र ठेवत असतो. जगणं जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यू
जाणून घेणं राहूनच जातं. आपल्या व आपल्या जवळच्या माणसाच्या
मृत्युपूर्व दु:खाची परिमाणं समजून घेण्यासाठी विवेकी आंतरिक संवादाची गरज असते.
नेमका हा संवादच मृत्युपूर्व दु:खातील कोलाहलात राहून जातो. मग वेदनेसोबत
येणारं दु:ख अनाकलनीय होत जातं. मृत्युपूर्व अस्वस्थता, प्रत्यक्ष मृत्यू, त्यानंतर
काळजीवाहकाला वाटणारं दु:ख हे सारं समजून घेण्याऐवजी टाळण्याकडे आपला कल वाढत
जातो. मग दु:खाची कधी न सुटणारी निरगाठ होऊन बसते. त्यातून मागे उरलेल्यांचं
मन:स्वास्थ्य हळूहळू बिघडू शकतं. घटना केव्हाच भूतकाळात वाहून गेलेली असते;
मागे रेंगाळत राहते, जीवनाला ग्रासून टाकणारी असह्य अस्वस्थता!!
अशा वेळी – खरंतर त्याही आधी डॉ. संज्योतचे हे विवेकनिष्ठ, मृदू,
संवेदनशील, सहजसोपे विवेचन समजून घेणे संजीवक ठरू शकेल.
मराठी साहित्यात मानसशास्त्र समजावून देणार्या ह्या पुस्तकाने मोलाची भर पडेल,
यात शंका नाही.
– डॉ. प्रदीप पाटकर, मनोविकारतज्ज्ञ
अटळ दुःखातून सावरताना (Atal Dukhatun Sawartana)
मृत्युपूर्व अस्वस्थता, प्रत्यक्ष मृत्यू, त्यानंतर
काळजीवाहकाला वाटणारं दु:ख हे सारं समजून घेण्याऐवजी टाळण्याकडे आपला कल वाढत
जातो. मग दु:खाची कधी न सुटणारी निरगाठ होऊन बसते. त्यातून मागे उरलेल्यांचं
मन:स्वास्थ्य हळूहळू बिघडू शकतं. घटना केव्हाच भूतकाळात वाहून गेलेली असते;
मागे रेंगाळत राहते, जीवनाला ग्रासून टाकणारी असह्य अस्वस्थता!!
अशा वेळी – खरंतर त्याही आधी डॉ. संज्योतचे हे विवेकनिष्ठ, मृदू,
संवेदनशील, सहजसोपे विवेचन समजून घेणे संजीवक ठरू शकेल.मराठी साहित्यात मानसशास्त्र समजावून देणार्या ह्या पुस्तकाने मोलाची भर पडेल,
यात शंका नाही.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Add to cart
Buy Now
Categories: आरोग्य, मानसशास्त्र, माहितीपर, ललित
Tags: Manovikas Prakashan, संज्योत देशपांडे (Dr Sanjyot Deshpande)
Be the first to review “अटळ दुःखातून सावरताना (Atal Dukhatun Sawartana)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.