हल्ली मुलांना खेळ घ्यायचा म्हटले की, शेकडो रुपयांना चाट बसतो. नव्याचे नऊ दिवस यानुसार मुले काही दिवस नवीन खेळ उत्साहाने खेळतात. पण नंतर तोचतोच खेळ खेळून कंटाळा आला, अशी तक्रार सुरु करतात. अशा वेळी सतत नवी खेळणी कशी आणायची याची चिंता पालकांना सतावते.
याचे उत्तर म्हणजे विज्ञानाचे खेळ मुलांना शिकवावेत यासाठी महागड्या खेळांपेक्षा सभोवताली सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंना नवे रूप देऊन नवनवीन विज्ञान खेळणी कशी तयार करता येतात, याचे प्रात्यक्षिक अरविंद गुप्ता यांनी ‘खेळ विज्ञानाचे – कृती आणि कौशल्य’ या प्रकल्प पुस्तकातून दाखविले आहे.
पुठ्ठ्यांपासून ससे तयार करून त्यांचा शर्यतीचा मजेशीर खेळ, पुठ्ठ्याचा पक्षी, वाय आकाराचे झाड, कागदाचे वेगवेगळे आकार करून त्याचा तंत्रज्ञानासाठी वापर, कागदाचे घर, उड्या मारणारा बेडूक, पोस्टकार्डातून तयार होणारा तीन पात्यांच्या पंखा, पर्जन्यमापक, विद्युत मोटार, चीनमध्ये एक हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेले ‘टॅनग्रॅम’ हे कोडे अशी १२३ विज्ञान खेळणी व प्रकल्प तयार करायला यातून शिकता येते.
Reviews
There are no reviews yet.