रॉ – मराठी (Raw -Marathi)

Shop

रॉ – मराठी (Raw -Marathi)

325.00

भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचे. आज आपल्या नजीकच्या भूतकाळाबद्दल नाहक शंका उपस्थित केल्या जात असताना, गेल्या पन्नास – साठ – सत्तर वर्षात आपण काय केले, असे न्यूनगंड निर्माण करणारे सवाल केले जात असताना, येत – जात इस्त्रायलच्या ‘मोसाद’ चे उदाहरण देत आपल्या देशाच्या तथाकथित दौर्बल्याचा प्रचार केला जात असताना , ‘रॉ’ चा हा पडद्याआडचा इतिहास जाणून घेणे अत्यावश्यक आहे. एका सशक्त सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून ते आपले कर्तव्यच आहे.

Placeholder

325.00

Add to cart
Buy Now
Compare

बांगलादेश मुक्तियुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची, सिक्कीमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची… शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची… ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ कथा नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया नीतीवंत अवकाशात घडत नसताना त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरून चालत असतात हि बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहीमा. तिथे नैतिक – अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित.
भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवून ‘रॉ’ च्या अनेक ज्ञात – अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात. भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचे. आज आपल्या नजीकच्या भूतकाळाबद्दल नाहक शंका उपस्थित केल्या जात असताना, गेल्या पन्नास – साठ – सत्तर वर्षात आपण काय केले, असे न्यूनगंड निर्माण करणारे सवाल केले जात असताना, येत – जात इस्त्रायलच्या ‘मोसाद’ चे उदाहरण देत आपल्या देशाच्या तथाकथित दौर्बल्याचा प्रचार केला जात असताना , ‘रॉ’ चा हा पडद्याआडचा इतिहास जाणून घेणे अत्यावश्यक आहे. एका सशक्त सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून ते आपले कर्तव्यच आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रॉ – मराठी (Raw -Marathi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X