लेखक अरविंद गुप्ता यांचे हे मजेदार पुस्तक आहे. निलांबरी जोशी यांनी पुस्तकाचा अनुवाद केला आहे. मनोरंजन, शिक्षण आणि स्वनिर्मितीचा आनंद अशा अंगाने या पुस्तकाकडे पाहता येईल.
कोणत्याही फाटक्या कागदापासून चौकोन कसा बनवायचा, कधीही न संपणारे पुस्तक, ओरगामी विमान, काड्यांची जादू, हात न उचलता चित्र काढा, बोलणारे दगड, बोलणारा बेडूक, तिहेरी चित्र, तरंगणारा चेंडू, छोटी तारांगणे, डेंजर स्कूल आदी शिर्षकामधूनच उत्सुकता निर्माण होते.
साध्या साहित्यातून म्हणजेच कमी खर्चातून वैज्ञानिक गोष्टी कशा शिकायच्या याचे यामधून मार्गदर्शन मिळते; तसेच ‘कचरा कमी करा’ सारखे संदेशही मिळतात. पुस्तकातील भरपूर आकृत्या अन चित्रांमध्ये मुलांबरोबरच त्यांचे पालकही रंगून जातील.
Reviews
There are no reviews yet.