ऐक मानवप्राण्या, तुझी कहाणी
तू घडलास कसा?
मूठभर होतास संख्येनं.
लाखभर वर्षांमध्ये सातेक अब्ज झालास.
दोनशे देश, हजारो भाषा, शेकडो लिप्या,
अगणित तंत्र आणि शास्त्र
हे ‘एका’चं ‘अनेक’ होणं – हीच तुझी कहाणी
प्रश्न सोडवत इथपर्यंत आलास.
दर पावलाला नवे प्रश्न उत्पन्न केलेस.
‘माणुसकी’ म्हणजे काय?
‘अमानुषता’ कशात असते?
पदोपदी या प्रश्नांना सामोरा जातो आहेस –
कधी जाणीवपूर्वक, फारदा अजाणताच.
पाहा तर, स्वत:ची कहाणी – उत्तरं शोधायला!
Reviews
There are no reviews yet.