अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर ( Anuvishwatil Dhruv: Dr.Anil kakodkar)

अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर ( Anuvishwatil Dhruv: Dr.Anil kakodkar)

अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव’पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!

160.00

Placeholder

160.00

Add to cart
Buy Now

अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज’, `शिक्षण पंढरी’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘व्हिजन २०२०’नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५’ डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.
अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव’पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर ( Anuvishwatil Dhruv: Dr.Anil kakodkar)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0