केटरिंग कॉलेजचे कोर्सेस, पाककृती क्लासेस घेणे, स्पर्धात परीक्षकाची भूमिका आणि पाककृतींची विविध प्रकाशित पुस्तके यामुळे या पुस्तकाच्या लेखिका सौ. वैजयंती केळकर यांचा पाककृती क्षेत्रातील अधिकार लक्षात येतो. अंगभुत गुण व कृतीशील स्वभाव यामुळेच त्यांना ‘श्रीमती महाराष्ट्र’ हा पुरस्कारही नुकताच प्राप्त झाला आहे. या पुस्तकात त्यांनी पावाच्या पाककृतींची भरपूर विविधता दिली आहे.
० सँडविचेस
० ब्रेड रोल्स
० टोस्टस्
० पिझ्झा-बर्गर
० गोड पदार्थ
० ब्रेड वापरून केलेले पदार्थ…
…अशा सर्व पदार्थांबरोबरच ज्या पदार्थांची रंगत पावाबरोबर खाल्ल्याने वाढते अशा पदार्थांच्या पाककृतींचा समावेशही या पुस्तकात केला आहे.
थोडक्यात सांगायचे तर पावाची रंगत वाढविणारे खास नव्या पिढीसाठी हे एक परिपूर्ण पुस्तक होय!
Reviews
There are no reviews yet.