मुलांना गोष्टी ऐकण्याची जन्मजात आवड असते. वाढत्या वयाबरोबर पुस्तके वाचण्याचा त्यांना छंद जडतो. मुलांची वाचण्याची आवड जोपासण्याकडे पालकांनी डोळसपणाने बघून त्यांच्या हाती उत्तम पुस्तक देणं गरजेचं असतं.
एखादी शिकवण मुलांना उपदेशासारखी न देता मनोरंजक गोष्टीच्या रूपातून देण्याची आपली पारंपरिक पद्धत विलक्षण परिणामकारक आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते.
बोधप्रद आणि रंजक गोष्टींमुळे मुलांचा भावनिक, बौद्धिक आणि नैतिक विकास तर होतोच; शिवाय मुलांची कल्पनाशक्तीही वाढते.
प्रस्तुत पुस्तकात मुलांच्या करमणुकीबरोबरच योग्य शिकवण देणाऱ्या निवडक गोष्टींचा समोवश करण्यात आला आहे.
Reviews
There are no reviews yet.