दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी रोजगार कमी होत गेल्यास आर्थिक विषमता ही आज देशापुढची एक गंभीर समस्या …. वाढीला लागणार आणि आर्थिक विषमता वाढली की सामाजिक प्रश्नही निर्माण होणार , यावर उपाययोजना करून रोजगारनिर्मिती वाढीस कशी लागेल याचा ऊहापोह या पुस्तकात आनंद करंदीकर अभ्यासपूर्णरित्या करतात.
बेरोजगारीची आर्थिक सामाजिक – राजकीय कारणं , बेरोजगारीचे दुष्परिणाम याचं सरधोपट विश्लेषण न करता , अर्थशास्त्रीय सिध्दांतांचा आधार घेत करंदीकर विषयाची मांडणी करतात . सोप्या भाषेत कधी कवितांचा आधार घेत ते वस्तुस्थितीचं आकलन करतात . शिक्षण , आरोग्य , शेती , बांधकाम , हरित उद्योग , हस्तव्यवसाय , छोटे उद्योग अशा विविध क्षेत्रांत तब्बल ३ कोटी ६० लाख रोजगारनिर्मिती होण्यास देशात वाव आहे , हे ते साधार पटवून देतात . संख्याशास्त्रीय पध्दतीने आखणी केल्यास रोजगारनिर्मितीचं उद्दीष्ट आपण गाठू शकतो याचा ते विश्वास देतात . विविध तक्ते , आलेख यांच्या साहाय्याने ते विषयाची उकल सोप्या रितीने करतात.
हे पुस्तक एम.पी.एस.सी. , यू.पी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांनाही अतिशय उपयोगी ठरणार आहे.
सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या एका ज्वलंत समस्येची गंभीरपणे दखल घेत , त्यावर शास्त्रीय पध्दतीने उपाययोजना सांगणारं पुस्तक …
Reviews
There are no reviews yet.