अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल निरनिराळया क्षेत्रांमधील असामान्य व्यक्तींना गेली ११२ वर्षे नोबेल पुरस्कार दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
या पुस्तकामध्ये डॉ. चोबे यांनी सुरुवातीला आल्फ्रेड नोबेल यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं संशोधन व संशोधनादरम्यान त्यांनी दिलेला लढा हे सर्व उद्बोधकपणे रेखाटलं आहे. या पुरस्काराची पार्श्वभूमी आणि त्यांचा रंजक इतिहासही त्यांनी दिला आहे. त्यानंतर वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, अर्थशास्त्र आणि शांतता अशा विविध क्षेत्रांत नोबेल पारितोषिकप्राप्त निवडक ४७ दिग्गजांचा व्यक्तिपरिचय आणि त्यांच्या संशोधनाची व कार्याची तपशीलवार माहिती सहज सुंदर शैलीत पुस्तकातील प्रकरणांमधून वाचायला मिळते.
‘नोबेल लॉरेट्सचे असामान्य गुण कोणते?’ व ‘भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण करता येईल का?’ याबाबतचे विचारही डॉ. चोबे लेखात मांडतात.
‘नोबेल’ विजेत्यांच्या या कथा सर्वच वयोगटातील व्यक्तींचं कुतूहल शमवून त्यांच्या ज्ञानात अनमोल भरही घालतील…
Reviews
There are no reviews yet.