आपले शरीर निरोगी आणि सुदृढ असावे असे आपल्याला वाटत असते. जो निरोगी असतो तो आयुष्याचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. मात्र त्यासाठी आहार-विहार योग्य असावा लागतो.
रोजच्या जेवणात कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, सॅलड आणि फळांचा समावेश असावाच, त्याचबरोबर नियमित व्यायामही तेवढाच आवश्यक असतो. हे ज्याला साधते तो जीवनात यशस्वी होतो.
योगासने आणि प्राणायम आपल्याला दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी ऑक्सिजन पुरवतात आणि उत्साह वाढवितात. दिवसातला थोडासा वेळ आपल्या शरीरासाठी आपण दिला, तर दिवसभर ताजेतवाने राहण्यास आपल्याला मदत मिळते.
हे सगळे पटत असतानाही आपण ‘वेळ नाही’ या सबबीखाली व्यायामाकडेच दुर्लक्ष करतो आणि आजारांची मालिकाच आपल्या मागे लागते. ‘कळते पण वळत नाही’ हा वाक्प्रचार आता हद्दपार करण्याची खरोखरच वेळ आली आहे. कारण वयाच्या अगदी मध्यावरच हृदयरोगासारखे आजार माणसाला विळखा घालतायत, हे आपण आजूबाजूला पाहत आहोत.
या पुस्तकात विविध योगासने आणि प्राणायम, सूर्यनमस्कार आदींची अगदी सोप्या भाषेत सचित्र माहिती दिली आहे. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आता हवाय फक्त निग्रह आणि नियमितता, जी फक्त आपल्याच हातात आहे.
Reviews
There are no reviews yet.