मानवी इतिहासात ज्या काही थोड्या; पण अभूतपूर्व वाणी उपलब्ध आहेत त्यांपैकी एक ‘गोरखवाणी’ होय. या प्रवचनांचे मनन, चिंतन करून, या ब्रह्मज्ञानास समजून-उमजून घेऊन त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजे शांत; प्रसन्न, सुखी आणि समृद्ध जीवनाची वाटचाल करणे.
या पुस्तकात ओशोंच्या ध्यानसाधनेवर आधारित दहा प्रवचनांचा समावेश आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला ताणतणावाने ग्रासले आहे. या प्रवचनांतून तणावमुक्त जीवन जगण्याचा निश्चित मार्ग सापडतो. परमेश्वरास अपेक्षित असे जीवन जगून त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल, तर जीवनात ध्यानसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
ध्यानाची सुरुवात कशी करावी, ध्यान केव्हा करावे, ते कसे असावे, ध्यानसाधनेमुळे मानवीजीवनात कोणता आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरे या प्रवचनांद्वारे मिळतात.
‘हसिबा खेलिबा धरिबा ध्यान’, ‘अज्ञाताची साद’, ‘साधना : ज्ञानाचे बळ’ अशा दहा प्रवचनांतून ओशोंनी लोकांच्या विविध शंकांचं संवादात्मक स्वरूपात निरसन केलेलं आहे. जीवनोद्धारक आणि वैविध्यपूर्ण उदाहरणे, सहज व सोपी भाषा यामुळे ही प्रवचनं सामान्य व्यक्तीच्या हृदयास भिडतात आणि परमेश्वरप्राप्तीचा मार्ग सोपा करून देतात.
Reviews
There are no reviews yet.