सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कल्पना चावलाला मातीपेक्षाही ओढ होती ती अवकाशाची. स्वच्छंदी पक्ष्याप्रमाणे अवकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणार्या कल्पनाने हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपले प्रत्येक पाऊल त्याच दिशेने टाकले.
अॅरोनिटिक इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर शिक्षणासाठी कल्पना अमेरिकेत गेली तेच मुळी स्वप्नांचे पंख लेवून.
आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तिने अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले आणि जीवनसाथीही अमेरिकेचाच निवडला. अवकाशात जाण्याचे तिचे स्वप्न एकदा पूर्ण झाले; पण तेवढ्याने ती समाधानी झाली नाही. त्याच ओढीने पुन्हा एकदा ती कोलंबिया अंतराळयातून अंतराळ सफरीवर निघाली. ही सफरही यशस्वी झाली; पण…
अवकाशाची ओढ असलेली कल्पना अवकाशातच अंतर्धान पावली.
आकाशाइतकीच प्रेरणादायी असलेली अवकाशकन्येची कथा.
Reviews
There are no reviews yet.