आदिम जगतापासून ते आधुनिक जगतापर्यंतचा इतिहास मांडताना वैज्ञानिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्या शास्त्रज्ञांच्या उल्लेखाशिवाय पुढे जाणे अशक्य आहे. निसर्गदत्त बुद्धिमत्तेला अविरत कष्टांची जोड मिळाली तर कितीतरी गोष्टी सहजसाध्य होतात हे शास्त्रज्ञांच्या जीवनाकडे पाहून आपल्या लक्षात येते.
प्रस्तुत पुस्तकात इसवी सन पूर्वकालीन पायथॅगोरस ते विद्यमान विज्ञानयुगातील स्टीफन हॉकिंगपर्यंत वीस शास्त्रज्ञांचा समावेश आहे. हे चरित्रात्मक लेख वाचताना त्यांची निसर्गदत्त बुद्धिमत्ता व सर्जनशीलता, सकारात्मक वृत्ती, ज्ञानाचा व्यासंग, जिज्ञासा, सत्यशोधक दृष्टी आणि मानवीकल्याणाची आस ही गुणवैशिष्ट्ये आपल्याला मोहून टाकतात.
या पुस्तकातून वाचकांना शास्त्रज्ञांचे जीवन, त्यांनी लावलेल्या विविध शोधांच्या कहाण्या, अनेक अडथळ्यांना पार करून त्यांनी प्राप्त केलेले देदीप्यमान यश यांचा लेखाजोखा वाचायला मिळेल.
या शास्त्रज्ञांच्या जीवनप्रवासाद्वारे विविध क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारा प्रेरणास्रोतच प्रस्तुत पुस्तकातून लेखिकेने खुला केला आहे.
Reviews
There are no reviews yet.