19 व्या आणि 20 व्या शतकात असे अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेले ज्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी अतोनात प्रयत्न केले.
भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर आणि 18 व्या शतकाच्या शेवटी खर्या अर्थाने आधुनिक काळाची, समाजपरिवर्तनाची आणि राष्ट्रउभारणीची सुरुवात झाली.
ब्रिटिशांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हजारो वर्षांपासून सुप्त, परंपराग्रस्त आणि अंतर्मुखी भारतीय समाजात जागृती निर्माण झाली.
अनेक भारतीयांना आधुनिक जगातील आधुनिक विचारांनी प्रेरित केले. इंग्रजी शिक्षण मिळाल्यामुळे त्यांना आपल्या समाजातील भयानक परिस्थितीची तीक्रतेने जाणीव झाली आणि ती बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज भासली. याचदरम्यान राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, म.फु, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, लो. टिळक, म. गांधी, मदर तेरेसा असे कर्तृत्ववान आणि द्रष्टे नेते उद्यास आले आणि यांनीच आधुनिक भारताचा पाया रचला. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील गुणदोषांचा पुनर्विचार सुरू झाला. या समाजधुरिणांनी आपली क्षमता आणि बुद्धी याप्रमाणे आपले कार्यक्षेत्र निवडून त्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी असामान्य कार्य केले. अशा काही प्रमुख राष्ट्रपुरुषांची थोरवी आणि त्यांच्या जीवनकथा या पुस्तकात सांगितल्या आहेत.
‘‘आजच्या तरुण पिढीला या समाजसुधारकांची आणि राष्ट्रपुरुषांच्या कार्याची ओळख होणे गरजेचे आहे. या दृष्टीने इंदुमती यादींच्या या लेखसंग्रहाची उपयुक्तता अमोल आहे. अत्यंत सोप्या भाषेत आणि अत्यंत कमी शब्दांत त्यांनी राजाराम मोहन रॉय यांच्यापासून महात्मा गांधींपर्यंतच्या दोनशे वर्षांतील अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रपुरुषांच्या जीवनकर्याचा आढावा घेतला आहे. त्यातून तरुणांना आपल्या देशातील महान नेत्यांच्या कार्याची ओळख होईल आणि प्रेरणाही मिळेज.’’
– प्रा. डॉ. पारस बोरा
माजी विभागप्रमुख, लोकप्रशासन विभाग,
डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, औरंगाबाद.
Reviews
There are no reviews yet.