का रे भुललासी’ हा वपुंचा कथासंग्रह ‘वरलिया रंगा’चा भेद करून माणसाच्या खर्या रंगांचे दर्शन घडवितो. माणसाला जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागते. प्रसंग निराळे तसा मुखवटाही निराळा, त्यात माणूस आपले अंतरंग, सुख-दु:खे, प्रेम, प्रतारणा, भ्याडपणा, हताशपणा, सूड लपवत जगत असतो. हे मुखवटे, बुरखे परिस्थितीनुरूप घालावे लागतात तर लबाडपणाने घातलेले बुरखे वेगळेच असतात ! प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. आपण आपल्याच रंगांनी माणसं, प्रसंग रंगवू पाहतो. खुल्या मनाने, खुल्या दिलाने विचार करत नाही. दुसर्यावर आपले विचार लादू पाहतो. हे ही एक प्रकारचे मुखवटेच की ! वपुंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, ह्या वरवरच्या भुलण्यामध्ये आपल्याला माणसाचे, जगाचे, निसर्गाचे खरे रंग कधी सापडतच नाहीत.
Vapu Kale’s Ka Re Bhulalasi strips away illusions to reveal human nature’s true colors. Life demands different masks—hiding love, betrayal, fear, and revenge. Some masks are circumstantial, others deceitful. We impose our views, failing to see reality. In Vapu’s words, amidst these illusions, we rarely discover life’s true essence.
Reviews
There are no reviews yet.