पोलिसातली नोकरी म्हणजे माणसाला मुळापासून हलवून टाकणारा अनुभव . कायद्याची अंमलबजावणी करत असताना अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांच्या मनाची कुतरओढ होते कायद्यातल्या पळवाटांमुळे नाही रे वर्गावर अन्याय होत असल्याचं बघावं लागतं . ना ही कुतरओढ व्यक्त करता येते , ना फरफट, अर्थात कधी कधी निखळ समाधानाचे क्षण हि वाट्याला येतात .वर्दीच्या आतला माणूस हे सारं कसं पचवतो . तीस वर्षांच्या पोलिसी सेवेतील अनुभवांबाबत , व्यवस्थेबद्दल समाजातील भल्या -बुऱ्या प्रवृतींबाबत ज्येष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांनी केलेलं चिंतन .
सदानंद दाते म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला तारा आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी कधीही न्यायाची आणि सत्याची कास सोडली नाही. अशा सुचवटीच्या अधिकाऱ्याने नोंदवलेल्या या नोंदी पोलीस खात्यातल्या प्रत्येक तरुण उमेदवाराने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाचायला हव्या.
Reviews
There are no reviews yet.