‘शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय? ते मिळतात कुठे? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव! ‘
Reviews
There are no reviews yet.