अज्ञाताबद्दलचे कुतूहल अन् अज्ञाताचा वेध घेण्याची जिज्ञासा यांमुळे अनेक धाडसी प्रवासी वसुंधरेच्या विविध भागांचा शोध घेत राहिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अन् पराकाष्ठेच्या जिद्दीमुळे ज्ञानाची नवनवीन क्षितिजे उदयास आली. निर्मिती, व्यवसाय, वितरण, व्यापार, उद्योग, प्रवास, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, इतिहास, भूगोल अशा मानवी जीवनाच्या अनेक आयामांवर या शोधयात्रांचा अमिट ठसा उमटला. ज्या भागांतून हे प्रवास घडले; त्या त्या भागांत कला, वास्तू, शिल्प, संगीत, साहित्य, धर्म, जीवनमूल्ये आदींची देवाणघेवाण होत राहिली – कधी सहकार्यातून, तर कधी संघर्षातून. ‘भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य सादर होत असते.’ या विधानाची प्रचिती देणार्या – आपल्या शोधयात्रांमधून नवा इतिहास घडवणार्या शोधनायकांची गाथा.
Reviews
There are no reviews yet.