अक्षरमात्र तितुकें नीट (Aksharmatra Tituke nit)

Shop

अक्षरमात्र तितुकें नीट (Aksharmatra Tituke nit)

-13%

Original price was: ₹160.00.Current price is: ₹140.00.

अरुण फडके औपचारिक लेखनात, औपचारिक भाषणात प्रमाणभाषा वापरावी आणि अनौपचारिक वातावरणात तुम्ही बोली वापरा आणि तुम्हांला आवडणारी कुठलीही भाषा वापरा. परंतु औपचारिक सामाजिक संदर्भात मात्र प्रमाणभाषेचा आग्रह धरणे आवश्यकच आहे. जर प्रमाणभाषेचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर तिचे लेखन हे प्रमाणलेखनच झाले पाहिजे. प्र. ना. परांजपे.

Placeholder

Original price was: ₹160.00.Current price is: ₹140.00.

Add to cart
Buy Now
Compare

‘आपल्याकडे असा गैरसमज दिसतो की, मराठी आपण बोलतो, लिहितो, आपली भाषा आहे, तिच्यात काय शिकायचे? ही बेफिकिरी झाली. कारण भाषा या माध्यमामुळेच ग्रहण केलेला विषय तुम्ही दुसऱ्यासमोर मांडत असता. भाषेवरचे प्रभुत्व तुम्हांला विचाराची शिस्त शिकवत असते. डॉ. अशोक केळकर बहुतेकांचे मराठी लेखन गरजेनुसार चालू राहते. ते बरेचसे सरावाच्या आधारावर आणि कित्येकदा काहीसे चाचपडत…. मराठी लिहिणे, वाचणे शिकलेल्या वा शिकू इच्छिणाऱ्या माणसांचे हे चाचपडणे कधीतरी संपावयास हवे; हे साधण्यासाठी थोडासा आवर्जून प्रयत्न करण्याची गरज आहे. तर आपल्याला लेखन आत्मविश्वासपूर्वक करता येणे अजिबात अशक्य नाही. असा आत्मविश्वास आल्यावर मराठीतून लिहिणे टाळावे असे तुम्हांला वाटणार नाही. सरोजिनी वैद्य शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे. आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा अचूक लिहिली गेली पाहिजे. अरुण फडके औपचारिक लेखनात, औपचारिक भाषणात प्रमाणभाषा वापरावी आणि अनौपचारिक वातावरणात तुम्ही बोली वापरा आणि तुम्हांला आवडणारी कुठलीही भाषा वापरा. परंतु औपचारिक सामाजिक संदर्भात मात्र प्रमाणभाषेचा आग्रह धरणे आवश्यकच आहे. जर प्रमाणभाषेचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर तिचे लेखन हे प्रमाणलेखनच झाले पाहिजे. प्र. ना. परांजपे ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अक्षरमात्र तितुकें नीट (Aksharmatra Tituke nit)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X