‘गुरुनाथ आबाजी कुलकर्णी तथा जीए. मराठी कथाविश्वात सूर्यासारखे तळपणारे हे नाव. ज्ञानपीठ पारितोषिकाच्या तोडीचे मराठी साहित्य निर्माण करणारा साहित्यिक असा लौकिक अवघ्या सत्त्याण्णव कथांमधून मिळवणारा प्रतिभावान साहित्यिक जीएंच्या कथांचे नेपथ्य जसा त्या कथेवर, कथेतल्या व्यक्तींवर, त्यांच्या आयुष्यांवर, वाचकांवर अमिट परिणाम घडवते; तसा जीएंवर, त्यांच्या घडण्यावर, त्यांच्या प्रतिभेवर त्यांच्या आजूबाजूच्या आसमंताने काय परिणाम घडवला असेल? या उत्सुकतेतून प्रा. अ. रा. यार्दी आणि प्रा. वि. गो. वडेर या दोघांनी सुरू केला एक शोध. एक असामान्य कथाकाराच्या साहित्यातील परिसराचा प्रत्यक्ष धांडोळा घेऊन त्या कथाकाराच्या प्रतिभेचा वेध घेण्याचा मराठी साहित्यातील विरळा आणि वेगळा प्रयोग म्हणजे जीएंची कथा : परिसरयात्रा ‘
Reviews
There are no reviews yet.