‘पाप म्हणजे काय पुण्याची व्याख्या कशी करणार ? की पाप किंवा पुण्य – असं काही नसतंच? असतो तो फक्त बघणाऱ्याच्या दृष्टिकोनातील फरक सामाजिक नियमांच्या चौकटीनुसार न वागणं, त्या चौकटीला आव्हान देत ती मोडणं – म्हणजे पाप ठरेल का? योगी आणि भोगी यांच्यात नेमका फरक काय? भोगी मनुष्य आसक्तीचा त्याग करू शकत नाही, तशी योग्यालाही त्यागाची आसक्ती असतेच ना? माणसांच्या जीवनातील वास्तव घटनांचा आधार घेऊन मानवी संस्कृतीतील चिरंतन मूल्यांचं विश्लेषण करणारी साहित्यात अन् हिंदी रुपेरी पडद्यावर गाजलेली कादंबरी चित्रलेखा. श्रेष्ठ हिंदी साहित्यिक भगवतीचरण वर्मा यांच्या या अभिजात कादंबरीचा मराठी अनुवाद चित्रलेखा’
Reviews
There are no reviews yet.